Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं | Sharad Pawar Rajya Sabha Bid Faces Congress Dissent | Maharashtra Political Update

Maharashtra RS seats political equation : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. त्या जागांसाठी आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. पण शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसच्या एका गटाकडून विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाची चर्चा सुरू आहे, त्यामुळे शरद पवार यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

शरद पवारांच्या उमेदवारीवर हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा आता थांबल्या असून दोन्ही बाजूंनी स्वतंत्रपणे पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत भाष्य केले आहे. शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये विरोध असल्याच्या चर्चेवर बोलताना सपकाळ म्हणाले की, “या संदर्भात वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल”

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart