जि. प. पं. स. च्या १५ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त !

खेड तालुक्यात १५ जणांची अनामत जप्त
मतदारांची नोटालाही पसंती ; १३ हजारांहून अधिकची रक्कम
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ : तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत १५ उमेदवारांना आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) गमवावे लागले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या १२ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अनेक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता ‘नोटा’चा पर्याय निवडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी केवळ दयाळ गटातील तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये चंद्रसेन मोहिते (१५८ मते), इनायतुल्ला रहिमान (१४३ मते) आणि विजय राक्षे (१ हजार १४४ मते) यांचा समावेश असून, प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे ३ हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. पंचायत समितीच्या १४ पैकी ६ गणांतील १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये लोटे गणातून विपुल तांबे, गुणदे गणातून रत्नाकर कारेते, प्रकाश पालांडे व बबन जाधव, वीराचीवाडी गणातून मधुकर शिंगे व दिनेश पोफळकर, अंजनी गणातून राबिया जसनाईक व अभिलाषा जाधव, भरणे गणातून मिलिंद गमरे व प्रशांत मंडलिक तर तिसंगी गणातून किशोर जाधव व चंद्रकांत मोरे यांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या या उमेदवारांकडून एकूण १० हजार ७०० रुपये अनामत रक्कम जप्त झाली असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिळून एकूण १३ हजार ७०० रुपयांची रक्कम जप्त झाली आहे.
—–
‘त्यांना’ आत्मचिंतनाची गरज
या निवडणुकीत मतदारांनी ‘नोटा’ला दिलेली पसंती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या ७ गटांमध्ये एकूण १ हजार ४७१ मतदारांनी नोटाचा वापर केला. यात सर्वाधिक ३३५ मते भरणे गटात पडली आहेत. पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये एकूण १ हजार ३०६ मतदारांनी नोटाला मतदान केले. यामध्ये खवटी गणात सर्वाधिक १९२ तर धामणदिवी गणात १३७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. टपाली मतदानातही नोटाला मते पडल्याने ही बाब सर्वच राजकीय पक्षांसाठी आत्मचिंतन करण्याची असल्याचे बोलले जात आहे.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart