शिवजयंतीनिमित्त देवगिरी किल्ल्यावर ‘बाल शिवबा-जिजाऊ’ फोटोसेशन:ऐतिहासिक वातावरणात नव्या पिढीला शिवसंस्कारांची प्रेरणा‎

शिवजयंतीनिमित्त देवगिरी किल्ल्यावर ‘बाल शिवबा-जिजाऊ’ फोटोसेशन:ऐतिहासिक वातावरणात नव्या पिढीला शिवसंस्कारांची प्रेरणा‎
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची व संस्कारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देवगिरी किल्ल्यावर ‘बाल शिवबा–जिजाऊ’ या ऐतिहासिक संकल्पनेवर आधारित विशेष फोटोसेशनचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा उपक्रम उत्साहात सुरू असून नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात लहान मुलांना ‘बाल शिवबा’ तर महिलांना राजमाता जिजाबाई यांच्या वेशभूषेत सजवून किल्ल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर छायाचित्रण केले जात आहे. पारंपरिक पोशाख, तलवार, भगवा ध्वज आणि शिवकालीन सजावटीमुळे संपूर्ण परिसरात इतिहास जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या फोटोसेशनद्वारे छत्रपतींच्या बालपणातील संस्कार, शौर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्राभिमानाची जाणीव मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या जिजाऊंच्या संस्कारांची महतीही या माध्यमातून अधोरेखित केली जात आहे. इतिहासाविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. शीतल गवळी यांनी सांगितले की, “लहान मुलांना शिवचरित्राची ओळख करून देण्यासाठी आणि इतिहासाविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी असे सांस्कृतिक उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना इतिहासाशी जोडण्याचा हा प्रभावी मार्ग ठरू शकतो.”

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart