विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करीयर करावे:सीईओ विवेक गायकवाड यांचे आवाहन, शिरडशहापूर येथे विज्ञान मेळावा उत्सहात

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करीयर करावे:सीईओ विवेक गायकवाड यांचे आवाहन, शिरडशहापूर येथे विज्ञान मेळावा उत्सहात
विद्यार्थ्यांनी शालेय जिवनापासूनच निश्‍चित ध्येय ठरविले पाहिजे प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करून नांव लौकिक मिळवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बुधवारी ता. १८ शिरडशहापूर (ता. औंढा नागनाथ) येथे केले. शिरडशहापूर येथील रेसन्स इंग्लीश स्कुलच्या वतीने आयोजित विज्ञान मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, संस्थेचे अध्यक्ष मिलींद यंबल, अश्‍विनी यंबल, गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले की, विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञाना विषयी आवड निर्माण होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगांना सादरीकरण करण्यास मदत होते. त्यामुळे अशा प्रकारचे मेळावे होणे गरजेचे आहे. त्यासाठी खाजगी शाळांनी पुढाकार घेणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करावे. सध्याचे युग स्पर्धेचे युग असून या स्पर्धेत टिकण्यासाठी जिद्द व परिश्रम करण्याची तयारी ठेवावी तसेच अभ्यासात सातत्य ठेवावे. परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करता आली पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय जिवनातील प्रसंग व गंमती जमती सांगितल्या. केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही तर त्यासोबतच व्यवहारीक ज्ञानही महत्वाचे आहे. तसेच मैदानी खेळही महत्वाचे आहे. त्यामुळे अभ्यासासोबतच मैदानी खेळ खेळण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विज्ञान मेळाव्याचा निकाल

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart