Ajit pawar Death : रोहितची काळजी वाटते, सरकारने सुरक्षेची जबाबदारी घ्यावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी Supriya Sule Demands Security for Rohit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून, राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार ( Rohit Rajendra Pawar ) हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart