सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात दीड कोटी टन उसाचे गाळप:एक महिना अगोदरच पट्टा

सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात दीड कोटी टन उसाचे गाळप:एक महिना अगोदरच पट्टा
जिल्ह्यात या वर्षीच्या ऊस गळीत हंगामात १२ सहकारी तर २३ खासगी मिळून ३५ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सुमारे ९२ दिवसांत म्हणजे दि. १५ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ५१ लाख ८८ हजार ६०३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ कोटी ३३ लाख ३४ हजार ६१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यावर्षी झालेल्या प्रचंड पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाचे फार मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखाने यावर्षी १ नोव्हेंबरच्या सुमारासच चालू झाले आहेत. यामध्ये सहकारी १२ तर खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. सहकारी साखर कारखान्यात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठेचा सर्वाधिक म्हणजे १०.८२ तर खासगीमध्ये बबनराव शिंदे शुगर तुर्क पिंपरी १०.८७ चा साखर उतारा मिळाला आहे. खासगीमध्ये ८.८३ तर सहकारी साखर कारखान्यात ८.७१ चा साखर उतारा बी हेवी/ सिरप/ज्यूस इथेनॉलकडे वळवलेला वगळून साखर उतारा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तालय कार्यालयाकडून दि. १५ फेब्रुवारीअखेरपर्यंत च्या मिळालेल्या माहितीनुसार अनुक्रमे सहकारी क्षेत्रातील खासगी व सहकारी मिळून ३५ कारखान्यांनी माहिती अद्यावत केलेली नाही. हार्वेस्टर मशिनच्या वापरामुळे लवकर गाळप यावर्षी जिल्ह्यातील बहुतेक कारखान्यांची गाळप क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे बहुतेक कारखान्यांचे गाळप तेवढेच झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेने कमी कालावधीत हे गाळप उरकले आहे. ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने लवकर गाळप झाले. पांडुरंग कारखान्याने गत वर्षीपेक्षा कमी कालावधीत गाळप उरकले असले तरी गाळप मात्र १ हजार टन वाढले. शिवाय यावर्षीच्या जादा पावसाने उसाला तुरा आल्याने उसाचे वजनही घटले होते. शासनाने साखरेच्या, विजेच्या व इथेनॉलच्या किमतीत वाढ न केल्यास राज्यातील साखर कारखानदारी समोर फार मोठे आर्थिक आव्हान निर्माण होणार आहे. गेली ७-८ वर्षांपूर्वीच्या असणाऱ्या किंमतीत वाढ केली पाहिजे. – यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart