
मासोद ग्रामपंचायत येथे आमदार रवि राणा तसेच माजी खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शन मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी- कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम मधे माजी पंचायत समिति सदस्या रश्मी घुले यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर लाडक्या बहिनी करिता आलेले वाण वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे ५०० ते ६०० महिला कर्यक्रमाला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित माजी जि.प सदस्य मयूरी कावरे, माजी प.स सदस्या मिनल डकरे, ग्रा.पं. सदस्य प्रीति पूरी, माधुरी मोकलकर, रेखा धर्माळे, रेखा वाघ, जयमाला मानकर, अविकला पवार, सुवर्णा केवतकर, सविता केवतकर, निता गवळी, मिसाळ, खंडारे, बावने, खंडार व महिलावर्ग उपस्थित होता. यावेळी माजी पंचायत समिति सदस्या रश्मी घुले म्हणाल्या की, हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व महिला एकत्र आलो आहोत, याचा आनंद होत आहे. हळदी-कुंकू हा संस्कृतीतील केवळ परंपरागत कार्यक्रम नाही तर तो महिलांच्या सन्मानाचा, आपुलकीचा आणि ऐक्याचा सोहळा आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनल डकरे, प्रिती पूरी, तसेच सर्व महिला व पुरुष पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.