
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलडाणा मिशन तर्फे १ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी रोजी मोताळा येथे आयोजित रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांचा एक लाख रुपयांचा एक वर्षासाठी अपघाती विमा उतरवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली दरम्यान, रक्तदान शिबिराला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय बढे, देवांश पाटील, योगेश चव्हाण, योगेश तायडे, गणेश देशमुख, नीलेश भोंडेकर, आदेश चोपडे, पवन कुकडे, राजेंद्र मानकर, अक्षय वखरे, रविराज सुरळकर, निखिल शिंबरे, प्रफुल राजपूत, नीलेश माटे, अक्षय चहाकर, चेतन शर्मा, अनंता संभाजी, मनोज दिवाने, विनोद ढोण, कुणाल वराडे, अमन बागवान, सुशांत सुपे, अभिजीत शिरपूरकर, अजय वराडे, प्रतीक पाटील, श्रीकृष्ण वाघ, सुजित बढे यांनी रक्तदान करून सक्रिय सहभाग नोंदवला याप्रसंगी श्रीराम बोदडे, मनोहर पाटील, सुरेश सरोदे, गणेश पाटील, डॉ. शरद काळे, अमोल देशमुख, प्रवीण जवरे, प्रशांत पाटील, राहुल आढाव, तुळशीराम मापारी, ज्ञानेश्वर खंडागळे, बाळकृष्ण उदयकार, बळीराम दाभोळकर, विजय इंगळे, शिवशंकर राऊत, गजानन मामलकर, रणजीत बोराडे, दीपक शेळके, चंद्रकांत पाटील, योगेश महाजन, इनायत खान, गजानन जंगले, जावेद खान, मिलिंद अहिरे, किरण पाखरे यांची उपस्थिती होती. या रक्तदान शिबिराला लीलावती ब्लड बँकेचे दिगंबर ठोंबरे, सत्यवान राऊत, उमेश भांबळे, वैष्णवी इंगोले, महाजन, श्रुती बोंद्रे या चमूने मेहनत घेतली असून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते .