
रूद्रशक्ती गुरुकुल मर्दानी प्रशिक्षण केंद्रात लाठीकाठी, भाला, कराटे प्रशिक्षणासाठी माझी मैत्रीण जायची. मीही तिच्यासोबत पाच वर्षांपासून जॉईन केले. तीन वर्षांपूर्वी माझ्याच क्लासमधील मैत्रिणीने १० तास लाठीकाठी खेळाचे प्रदर्शन करून रेकॉर्ड केले. त्यावेळी मलाही असं काही तरी करावं वाटलं. आई-वडील सरांशी बोलले अन॰ दीड वर्षापासून तयारी सुरू झाली. पहाटे पाचला उठून दोन तास दांडपट्टा सराव. ध्यानध्यारणा. कच्च्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये, प्रथिनेयुक्त पदार्थ ( शाकाहारी जेवण) असा आहार आहे. शाळेचा अभ्यास सुरूच आहे. माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकातून प्रेरणा मिळाली. सहा महिन्यांपासून अनेकदा सलग १४ तास दांडपट्ट्याचा केलाय. आज गुरुवारी विश्वविक्रम करण्याचा विचार आहे. सोनाक्षी मोहन माडे सांगत होती. आई गृहिणी व वडील खासगी नोकरी करतात. परिस्थिती बेताची असली तरी हार न मानता जिद्दीने उभारी घेतेय. शिवजयंती दिनाचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजून १५ मिनिटांपर्यंत हा उपक्रम सुशील रसिक सभागृहात होणार आहे. स्वातंत्र्य सैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान संचलित रूद्रशक्ती गुरुकुल योगिनाथ फुलारी चालवितात. विवेक मिस्कीन हे प्रशिक्षक आहेत. जुना विडी घरकुल भागात या संस्थेची शाखा असून तिथे नियमित प्रशिक्षण अनेक विद्यार्थी घेतात. पहाटे पाचला सुरू होतो दिवस पहाटे पाचपासून दोन तास सराव. ३० मिनिटे ध्यानधारणा. सकाळ- संध्याकाळचा आहार डायटप्रमाणे. मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, सालाड, कच्च्या भाज्या, उसळ, गुळ, ड्रायफूट. पुस्तक वाचन. शाळेचा अभ्यास, क्लास असे १४-१६ तासांचा दिनक्रम. ऑरेंज, ग्रीन बुक दांडपट्टा सलग पाच तास फिरवण्याचे रेकॉर्ड आहे. आज बारा तास फिरवण्याच्या रेकार्डची तयारी. पाच वर्षांपासून लाठीकाठी प्रशिक्षण घेत अाहे. दोन- अडीच वर्षापासून दांडपट्टा प्रशिक्षण. दोन ते तीन तास सराव. दहा ते बारा वेळा सलग १४ तास सराव केलाय. दांडपट्ट्याचे वजन १४०० ते १८०० ग्रॅम. जीवनाची वेगळी पाऊलवाट जीवनात काहीतरी वेगळी पाऊल वाट अोलांडावी असे नेहमी मला वाटत होतं. दांडपट्टा चालविण्याची मला प्रेरणा झाली. हा शिवकालीन खेळ आहे. माँ जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा. सरांचे व कुटुंबाचे पाठबळ आहे. गुरुवारी दांडपट्टा विश्वविक्रमाची तयारी आहे. युवती, तरुणींनी, युवकांनी असं वेगळ चॅलेंज घेऊन पुढे जावे, असे सोनाक्षी माडे सांगते.