
इन्टाक च्या माध्यमातून जतन केलेले चित्र.
छत्रपती संभाजीनगर राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे. या शब्दाला सार्थ ठरवणाऱ्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या. ऐतिहासिक दस्तऐवज, हस्तलिखिते, वस्तू, शस्त्रे यांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी राज्यातील पहिली प्रयोगशाळा संभाजीनग
.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १८ हजारांहून अधिक हस्तलिखिते आहेत, तर मराठवाड्यात खासगी आणि शासकीय संग्रहालयांमध्ये मिळून ३३ हजार हस्तलिखिते आहेत. काळाच्या ओघात ही हस्तलिखिते खंगत चालली आहेत. संग्रहालयातील चित्र, वस्तू, शस्त्र यांवरही फंगस, कीड आणि वातावरणामुळे परिणाम होत असल्याचे पुरातत्त्व अभ्यासकांचे निरीक्षण आहे. इन्टाकचे माजी अध्यक्ष मुकुंद भोगले यांनी अनेक वर्षांपासून या हस्तलिखितांचे जतन व संवर्धनाचा मुद्दा लावून धरला होता. महापौर समीर राजूरकर यांनी याची संवेदनशीलता लक्षात घेऊन तत्काळ प्रयोगशाळेचा मार्ग मोकळा केला आहे. इन्टाकचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकसिंह ठाकूर म्हणाले, दिल्ली, लखनऊ, भुवनेश्वर, कोलकाता आणि बेंगळुरू येथे इन्टाकने अशा प्रयोगशाळा उभारून ऐतिहासिक हस्तलिखितांचे जतन व संवर्धन केले आहे. आपला समृद्ध वारसा जतन करण्यासाठी ही प्रयोगशाळा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावेल. आजवर गोव्यातील म्युझियम ऑफ ख्रिश्चन आर्टमधील सुमारे २०० वस्तूंचे संवर्धन केले आहे. देशभरातील ५०० पेक्षा जास्त ऐतिहासिक इमारती, गंगाकाठच्या ५,३६१ ऐतिहासिक स्थळांची नोंदणी आणि दस्तऐवजीकरण पूर्ण केले आहे. ओडिशामध्ये ताडपत्रावरील हस्तलिखितांचे (Palm Leaf Manuscripts) जतन करून शतकानुशतके जुने ज्ञान सुरक्षित केले आहे. इन्टाक ही १९८४ मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. नवी दिल्ली हे मुख्यालय आहे. ही स्वायत्त संस्था असून ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर कार्यरत आहे.
ऐतिहासिक शहराचा महापौर म्हणून माझी जबाबदारी
या शहराचा प्रथम नागरिक म्हणून आपल्याकडे असलेला समृद्ध ऐतिहासिक वारशाची मला जाणीव आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा आपण जतन केला पाहिजे. हीच शिवजयंतीला माझ्यातर्फे शहरवासीयांना भेट राहील. – समीर राजूरकर, महापौर
खाजगी वस्तूंचेही जतन
प्रत्येकाकडे काही ना काही ऐतिहासिक वस्तू, वस्त्र आहेत. काही आठवणी आपण पिढ्यान््पिढ्या जतन करतो. पण, काळाच्या ओघात त्या जीर्ण होत जातात. त्यांचे संवर्धन करण्यासाठी आपल्याकडे काहीही व्यवस्था नाही, असे इन्टाकच्या माया वैद्य यांनी म्हणाल्या.