घोडेगाव, राजूरला अतिरिक्त तहसील‎:राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, तालुक्याला न जाता होणार कामे‎

घोडेगाव, राजूरला अतिरिक्त तहसील‎:राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, तालुक्याला न जाता होणार कामे‎
प्रशासकीय कामांच्या सोयीबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक त्या नागरी सुविधा कमी वेळेत, कमी अंतरावर उपलब्ध व्हाव्यात या हेतूने यापूर्वी अहिल्यानगरला अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर केले होते. त्याचे प्रत्यक्षात कामकाजदेखील सुरू झाले. त्यानंतर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील घोडेगाव (ता.नेवासे) व राजूर (अकोले) येथे अतिरिक्त तहसील कार्यालय निर्मितीस मंजूरी देण्यात आली. या दोन अतिरक्त तहसील कार्यालयात स्वतंत्र तहसीलदारांची नियुक्ती केली जाणार आहे. ज्या तालुक्यांचे विभाजन शक्य नाही, अशा तालुक्यांतील गावांचे विभाजन करून तहसील व अतिरिक्त तहसील कार्यालयांना ही गावे वाटून दिली जातात. त्यामुळे घोडेगावच्या नवीन अतिरिक्त तहसील कार्यालयामुळे या भागातील गावांना आता प्रशासकीय कामकाजासाठी नेवासे येथे न जाता घोडेगाव अतिरिक्त तहसील कार्यालयातच जावे लागेल. शिवाय आदिवासी तालुका असलेल्या अकोले व राजूरचे अंतर मोठे आहे. या भागातील नागरिकांना प्रशासकीय कामकाजांसाठी अकोले येथे जावे लागालचे, आता राजूरमध्ये त्यांना प्रशासकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी अहिल्यानगर शहर व तालुक्याचा झालेला विस्तार, अतिरिक्त कामांचा ताण लक्षात घेऊन अहिल्यानगर तहसील व अहिल्यानगर अतिरिक्त तहसील कार्यालये सुरु करण्याचा निर्णय त्यानूसार घेतला होता. अहिल्यानगरमध्ये अतिरिक्त तहसील कार्यालय सुरु झाले आहे. गावांच्या वि विकासाला चालना घोडेगाव येथे अतिरिक्त तहसील कार्यालय होणार असल्याने गावाच्या विकासाला गती मिळेल. गावाच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला निर्णय आहे. या निर्णयामुळे घोडेगाव व परिसरातील गावांच्या विकासाला चालना मिळणार असून प्रशासन अधिक कार्यक्षम आणि गतिमान होण्याची अपेक्षा आहे. – बाळासाहेब सोनवणे, माजी सरपंच, घोडेगाव (ता. नेवासा) काय होणार फायदा मंडलाधिकारी, तलाठी वर्गाकडे चकरा माराव्या लागणार नाहीत. ग्रामस्तरावर शेतीसंबधी जुने उतारे, सातबारा ही कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात जायची गरज नाही. शैक्षणिक दाखले गावाजवळ अतिरिक्त तहसील कार्यालयात मिळणार. ग्रामस्थांच्या वेळ व खर्चाची होईल बचत. कामांच्या विभाजनामुळे नागरिकांची कामे वेळेत यापूर्वी ठाणे, पुणे जिल्ह्यात अतिरिक्त तहसील कार्यालयाची निर्मिती केली होती. ज्या तालुक्यांत प्रशासकीय कामांचा अतिरिक्त ताण असतो, त्या तालुक्यातील गावांचा विस्तार, लोकसंख्या या सर्व बाबीचा विचार करून अतिरिक्त तहसील कार्यालये सुरु करण्यात येतात. प्रामुख्याने या प्रक्रियेत त्या तालुक्यातील गावांचे विभाजने केले जाते. काही गावे तहसील कार्यालयाला तर काही गावे अतिरिक्त तहसीलला जोडले जातात. प्रशासकीय कामांच्या विभाजनामुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणार आहेत. – सदानंद जाधव, निवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart