राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह:शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह:शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती राज्यभरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी जमली असून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला आहे. शिवनेरीवरील मुख्य शासकीय सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि इतर अनेक मान्यवर महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर पोहोचत आहेत. मान्यवरांच्या हस्ते पाळणा सोहळा आणि विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले शिवनेरीवर आणि विशेषतः शिवजन्म स्थळाच्या आतील भागात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गडाला ऐतिहासिक वारसा जपून विद्युत रोषणाईने उजळवून टाकण्यात आले आहे. या मंगलमयी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart