भोकणीला दुसऱ्यांदा 50 लाखांचे पारितोषिक:‎ग्रामपंचायतीने विकासकामे करून विभागीय स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक‎

भोकणीला दुसऱ्यांदा 50 लाखांचे पारितोषिक:‎ग्रामपंचायतीने विकासकामे करून विभागीय स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक‎
भोकणी येथील ग्रामपंचायतीने माझी‎वसुंधरा ५.० अभियानांतर्गत १५०० ते ‎‎२००० लोकसंख्या असलेल्या गटात ‎‎विभागीय स्तरावर ५० लाखांचे‎बक्षीस पटकावून घवघवीत यश‎संपादन केले आहे. ग्रामपंचायतीने ‎‎यापूर्वी माझी वसुंधरा अभियान ४. ० ‎‎मध्ये राज्यस्तरावर तिसऱ्या‎क्रमांकाचे ५० लाखांचे बक्षीस‎मिळवले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा‎माझी वसुंधरा ५. ० मध्ये सहभागी‎होऊन पर्यावरणपूरक कामांवर भर‎देत बक्षिसाच्या रक्कमेला गवसणी‎घालण्याचा अनोखा पराक्रम केला‎आहे.‎ सरपंच अरुण वाघ यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नेतृत्त्वात ग्रामपंचायतीने या स्पर्धेत‎सहभाग घेतला. पर्यावरण विकास‎कामांवर भर देत स्वच्छता,‎वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन,‎बंदिस्त गटारी, रस्ते, शासकीय‎इमारतींची रंगरंगोटी, नैसर्गिक‎धबधबा, प्राणी-पक्ष्यांच्या हुबेहूब‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎प्रतिकृती, पर्यावरणपूरक प्रवेशद्वार,‎प्लास्टिक बंदी, महिला सबलीकरण,‎आरोग्यविषयक जनजागृती आणि‎शैक्षणिक मूल्ये असे अनेक उपक्रम‎राबवण्यात आले. या कामांची दखल‎घेऊन ग्रामविकास मंत्रालय व‎महाराष्ट्र राज्य विभागीय स्तरावर ५०‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎लाखांचे बक्षीस नुकतेच जाहीर झाले‎आहे.‎ या उपक्रमासाठी ग्रामपंचायत‎कर्मचारी, आशा स्वयंसेविका,‎अंगणवाडी सेविका, मनरेगा मजूर‎आणि महिला बचत गटांच्या‎सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार‎पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी‎फडोळ, गटविकास अधिकारी‎अशोक भवारी, निलेश भुजाळ,‎सहाय्यक गटविकास अधिकारी‎ढवळे व ग्रामसेवक योगेश राहाणे‎यांचे मार्गदर्शन लाभले.‎ ग्रामपंचायतला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार‎ सिन्नर तालुक्यातील पहिले हगणदारी मुक्त गाव (२०१७/२०१८), संत‎गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (२०१८/२०१९) मुसळगाव गट प्रथम,‎संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (२०२२ ते २३) तालुका स्तरावर‎प्रथम, माझी वसुंधरा अभियान २०२४ (राज्यस्तरीय तिसऱ्या क्रमांकाचे ५०‎लाख रुपये बक्षीस, अटल भूजल योजना व समृद्ध गाव (२०२३ ते २०२४)‎जिल्हा स्तरावर प्रथम ५० लाख रुपये बक्षीस, आर. आर. आबा सुंदर गाव‎पुरस्कार २०२५ तालुका स्तरावर १० लाख रुपये बक्षीस, आर. आर. आबा‎सुंदर गाव २०२४/२५ जिल्हा स्तरावर २० लाख रुपये बक्षीस, माझी वसुंधरा‎५.० २०२५ जिल्हा स्तरावर ५० लाख रुपये बक्षीस.‎

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart