दुष्काळाचे सावट दूर:चणकापूरच्या आवर्तनाने 51 गावांचा पाणीप्रश्न सुटला, गिरणा पात्रात 15 दिवसात 900 दलघफू पाणी सोडणार‎

दुष्काळाचे सावट दूर:चणकापूरच्या आवर्तनाने 51 गावांचा पाणीप्रश्न सुटला, गिरणा पात्रात 15 दिवसात 900 दलघफू पाणी सोडणार‎
कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून कसमा परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ९०० दलघफू आवर्तन सोडण्यात आले असून यामुळे गिरणा नदी काठावरील ५१ गावातील पाणीपुरवठा योजनांना फायदा होणार आहे. ५ मार्च पर्येंत सुरु राहणाऱ्या या आवर्तनामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच या परिसरातून दुष्काळाचे सावट दूर होऊन कसमाचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. चणकापूर धरणात शिल्लक असलेल्या २३४० दशलक्ष घनफूट साठ्यापैकी या आवर्तनाच्या माध्यमातून गिरणा नदी पात्रात १५ दिवसात १००० क्यूसेसने ९०० दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. तर उर्वरित पाणीसाठा आगामी तीन आवर्तनासाठी तसेच अडचणीच्या व आणीबाणीच्या काळात तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मालेगाव कोट्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. आगामी उन्हाळ्याची तीव्रता बघता अवैध वीजपंप चालवून कुणी पाणी उपसा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. आवर्तनाने कळवण तालुक्यातील चणकापूर, अभोणा, पाळे खुर्द, कळमथे, पाळे बुद्रुक, दह्याने, हिंगळवाडी, मानूर, एकलहरे, कळवण, नाकोडा, नाविबेज ,जुनिबेज ,पाटविहीर , पिळ्कोस, बगडू, सावकी, गोसराने, भेंडी, निवाने, खेडगाव या २१ गावांमधील पुढील महिनाभरासाठीचा पाणीप्रश्न सुटणार आहे. तर सोबतच देवळा, सटाणा, मालेगाव या तिन्ही तालुक्यांमधील ३० गावांसह कसमाच्या ५१ गावांचा गंभीर होणारा पाणीप्रश्न सुटणार आहे. चणकापूर धरणातील आवर्तन सुटल्याने भरलेला नकट्या बंधारा. पुढे ४५ दिवसांच्या‎ अंतराने दोन आवर्तने‎‎ १५ दिवसाचे ९०० दशलक्ष घनफूटचे हे आवर्तन असून या माध्यमातून कसमा परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. यानंतर आगामी काळात ४५ दिवसाच्या अंतराने दोन आवर्तने देण्यात येतील. हे पाणी नागरिकांनी पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरावे व पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे. – अक्षय काळे, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart