रयतेच्या राजाचा जन्मोत्सव:शिवरायांवर 4 वर्षांनंतर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, मिरवणुकीसाठी 2 हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात

रयतेच्या राजाचा जन्मोत्सव:शिवरायांवर 4 वर्षांनंतर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, मिरवणुकीसाठी 2 हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात
जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव गुरुवारी (१९ फेब्रुवारी) शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ हा मंत्र जपत अवघ्या शहरात शिवजयंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाचा सोहळा अधिक खास आहे. कारण तब्बल ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्याचबरोबर शहरात ९५ ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात येतील. ३२ ठिकाणी स्वागतासाठी स्टेज उभारण्यात येणार आहे. नवीन छत्रपती संभाजीनगर उत्सव समितीकडून क्रांती चौकासह शहरातील विविध शिवस्मारकांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, असे नवीन शहराच्या महासंघाचे अध्यक्ष ज्योतीराम पाटील यांनी सांगितले. शहरात क्रांती चौक, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, चिकलठाणा, सातारा परिसर, बजाजनगर, दौलताबाद, बिडकीन, वाळूज परिसरात मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंती आणि रमजान महिन्याचा प्रारंभ एकाच वेळी आल्याने पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सुरक्षिततेसाठी शहरात २ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात असून पहिल्यांदाच १० ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आकाशातून हालचालींवर नजर ठेवली जाईल. या महाबंदोबस्तामुळे गुरुवारी (१९ फेब्रुवारी) होणारी पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत हेदेखील शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. उत्सव समितीतील शिवभक्तदेखील कायदा-सुव्यवस्था पाळण्यासाठी रस्त्यावर असणार आहेत. ८०० जिरेटोप सज्ज बालशिवाजीच्या ५०० ड्रेसची मागील वर्षी बुकिंग होती. यंदा ८०० वर पोहोचली आहे. ‘छावा’ चित्रपटातील शेरवानी आणि ५ हजारांपर्यंतच्या जरीच्या जिरेटोपाला मागणी आहे. शहरात सुमारे दीड लाख भगव्या झेंड्यांची विक्री झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिस्तीत शिवजयंती साजरी करावी शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर शिवजयंतीनिमित्त व्हावा, शिवभक्तांनी उत्साहात शिवजयंती साजरी करावी; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या शिस्तीनुसारच स्वराज्याची मांडणी करायची आहे. छत्रपतींच्या विचारांना आणि वारशाला शोभेल अशा प्रकारेच शिवजयंती साजरी करावी. – किशोर शितोळे, अध्यक्ष, जिल्हा शिवजयंती समिती. हे मार्ग वाहतुकीस बंद शिवजयंतीचा भव्य पट शिवचरित्र पारायण : सकाळी १० वाजता पारायण वाचन, ८ ठिकाणी सोहळ्याची सांगता; सामाजिक उपक्रम : रक्तदान शिबिराचे आयोजन गरजू विद्याथ्यांना शैक्षणिक किट वाटप. क्रांती चौकात आज काय असेल खास सकाळी : ५००० मुलींना महसंघाकडून फेटे बांधून सन्मान करण्यात येणार. सकाळी १० वा : मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे वेशभूषा व नृत्य प्रदर्शन. सकाळी ११ वा : विवेकानंद कॉलेजतर्फे भव्य पालखी यात्रा. सायंकाळी ६ वा : नेत्रदीपक लाइट-शो आणि शिवरायांचा भव्य देखावा. रात्री ८ वा : ३९६ दिव्यांची महाआरती. रात्री ११:५५ वा : महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart