निलंग्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून:शेतात जाताना डोक्यावर वार; अपघाताचा बनाव, हल्लेखोरांनी दुचाकी मृतदेहावर टाकली

निलंग्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून:शेतात जाताना डोक्यावर वार; अपघाताचा बनाव, हल्लेखोरांनी दुचाकी मृतदेहावर टाकली
मागील १५ दिवसांपासून लातूर शहरात कोयत्याचे हल्ले आणि खुनाचे सत्र सुरू आहे. रामलिंग मुदगड (ता. निलंगा) येथेही ३० वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली. संशयितांनी मृताची दुचाकी त्याच्या अंगावर टाकून अपघाताचा बनाव गुलाब खरोसे केला. गुलाब विलास – खरोसे (३०) असे मृताचे नाव आहे. पृमृत गुलाब खरोसे यांची वडिलोपार्जित शेती रामलिंग मुदगड शिवारात आहे. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन दुचाकीने शेताकडे निघाला होता. परंतु सकाळी वाटेतील एका शेताच्या कडेला त्याचा मृतदेह पडलेला शेतकऱ्यांना आढळला. मृताच्या संपूर्ण शरीरावर जखमा मृत गुलाब खरोळे हा अविवाहीत होता. त्याचे गावात कोणाशी प्रेमसंबंध आहेत का? ही शक्यता तपासण्यात येत आहे. तसेच, मृत तरुणाचे शेवटचे कोणाशी बोलणे झाले याचा शोध सुरू आहे. मृताच्या संपूर्ण शरीरावर खोल जखमा झालेल्या आढळल्या. आरोपींना जामीन मिळताच खून काही महिन्यांपूर्वी मृताच्या वडिलांनी गावातील काही लोकांच्या विरोधात जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. याप्रकरणी काही जणांना अटक झाली होती. हे संशयित जामिनावर बाहेर येताच खून झाला.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart