
छत्रपती शिवरायांचा अभिमान अन् मराठमोळा लूक तसेच आम्ही स्वराज्याचे पाईक दर्शवण्यासाठी तरुण फेटा, कुर्त्याचा पेहराव करतात, तर आजपर्यंत तरुणी, महिला नऊवारी लूकमध्ये दिसत. यंदा त्यांच्यासाठी खास राजमाता जिजाऊ साडीचा ट्रेंड आहे. राजेशाही लूकची ही साडी ८०० ते २५०० रुपयांत मिळते. सिंथेटिकसह पैठणी लूकमध्ये असलेल्या या साडीत तरुणी मर्दानीसह स्वराज्यजननी जिजाऊंची लेक दिसत असल्याची भावना तरुणी व्यक्त करत आहेत. पैठणीला चढवला नवा साज राजमाता जिजाऊ पैठणी’ ही ‘थीम बेस्ड सॉफ्ट सिल्क साडी’ आहे. पारंपरिक पैठणीचा टच, आधुनिक सॉफ्ट सिल्कचा मिलाफ. मल्टिकलर फ्लोरल बॉर्डर आणि पदरावरील ‘स्वराज्य प्रतीक’. साडीवर तुतारी, चंद्रकोर, नथ, शिवमुद्रा सिंथेटिक मिक्स, प्युअर सॉफ्ट सिल्क सिंथेटिक मिक्स ८०० ते २५०० रुपयांपर्यंत मिळतात. प्युअर सॉफ्ट सिल्क ५००० ते १५००० रुपयांपर्यंत मिळतात. ही साडी रॅली आणि मिरवणुकीसाठी डिझाइन्ड आहे. तिचे वजन ५०० ते ७०० ग्रॅमदरम्यान असते, ज्यामुळे ती दिवसभर नेसण्यास सोयीस्कर ठरते. डिझाइन, प्रतीक, अभिमान ‘तुतारी’ ही विजय, शौर्य घोषणेचे दर्शन घडवते, तर ‘चंद्रकोर’ शिवकालीन परंपरा, राजसत्तेचा समतोल दर्शवते. तलवार लढाऊ संस्कारांचे प्रतीक असल्याने, साडी ट्रेंडिंगला आहे. – ओंकार गंधे, प्राचार्य, डिझायर कॉलेज अँड फॅशन डिझायनर सध्या ट्रेंडिंगमध्ये साडी राजमाता साडी सॉफ्ट सिल्कमुळे वजनाने हलकी होते. ब्लाऊजवरील ‘चंद्रकोर आरीवर्क’ने खुलतात. – श्रुती भुतडा, सॅव्ही फॅशन डिझायनिंग