![]()
महाशिवरात्रीनिमित्त श्री सिद्धेश्वर यात्रा समितीने माचणुर येथे मंगळवारी आयोजित केलेल्या सिद्धेश्वर केसरी चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकांची कुस्ती वैभव माने व विकास सुळ यांच्यात झाली ती बरोबरीत सोडण्यात आली. या कुस्तीचे बक्षीस आमदार समाधान आवताडे यांच्यावतीने लावण्यात आले होती. या कुस्ती मैदानाचे उद््घाटक सरपंच दिलीप कुलूबर्मे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कुस्ती मैदानाला धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, सोमनाथ आवताडे, विनायक यादव, येताळा भगत, यात्रा कमिटी अध्यक्ष राजू बाबर आदींच्या हस्ते करण्यात आले आहे. यात्रा समितीतर्फे दोन्ही पैलवानांना १ लाख ५१ रुपयांचे पारितोषिक आणि सिद्धेश्वर चषक विभागून देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन, अनेक मल्ल व कुस्ती क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक उपस्थित होते. प्रथम क्रमांकांची लढत ही १ मिनिटे चालली. पैलवान जखमी झाला बोट मोडले, त्यानंतर पंच महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांनी बरोबरीत सोडली. माचणूर येथील सिद्धेश्वर कुस्ती आखाड्यात द्वितीय क्रमांकाची १ लाखांची कुस्ती उमाजी चव्हाण व विजय मांडवे यांच्यात झाली. या कुस्तीत उमाजी चव्हाण वाखरी याने हाप्ती डावावर २ मिनिटात पैलवान विजय मांडवे सोनारी यास चितपट केले. या कुस्तीमध्ये उमाजी चव्हाण विजयी झाला. तृतीय क्रमांकाची ७५ हजारांची कुस्ती संग्राम काकडे व शुभम मुसळे यांच्यात झाली, ती बरोबरच सोडवण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती ७१ हजारांसाठी रामचंद्र दुमकनाळ व अजय राजमाने यांच्यात झाली. या कुस्तीत रामचंद्र दुमकनाळ मंगळवेढा याने अजय राजमाने गार अकोले या आडव्या हात या डावावर चीतपट केले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती ६१ हजारांसाठी पाच नंबरची कुस्ती गणेश चव्हाण वाखरी व सचिन काळे यांच्यात झाली, ती बरोबरीत सोडवण्यात आली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती परमेश्वर गाडे व बिरुदेव बनसोडे यांच्यात झाली. बिरुदेव बनसोडे याने हरणपासा या डावावर गाडे यास पराभूत केले. रामा पुजारी व साहिल मुलानी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये पोकळ घुसा या डावावर साहिल मुलानी विजयी झाला. मैदानात १५० हुन अधिक कुस्त्या मैदानात माळशिरस, अकलूज, कुर्डवाडी, सोलापूर, खवासपुर, मंगळवेढा, मोहोळ, आटपाडी, कोल्हापुर, इंदापूर, पंढरपुर या ठिकाणच्या व्यायाम शाळेतील मल्लांचा सहभाग होता. मैदानात १५० हुन अधिक कुस्त्या झाल्या. दुपारी ११ ते २ या वेळेत कुस्त्या नेमण्यात आल्या होत्या. रात्री ९:३० पर्यंत मैदानमधे कुस्त्या चालल्या. त्याला कुस्ती शौकिनानी गर्दी केली होती. पंच म्हणून सुग्रीव डोके, महेंद्र घोडके, कुमार सरवळे, मुरलीधर सरकळे, सुनील पाटील, विकास तेरवे यांनी काम पाहिले. उत्कृष्ट कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने, दिलीप बिनवडे यांनी काम पाहिले.