
माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवणाऱ्या अर्जदाराला जळगाव महापालिकेने चक्कबाजार भावापेक्षा दुप्पट किमतीत पेनड्राइव्ह घेण्यास भाग पाडले. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते हितेंद्र टेकावडे यांनी जनमाहिती अधिकाऱ्यांना लेखी पत्रदेत 10 दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली आहे. पेनड्राइव्ह खरेदी बिलांची मागणी केली असता दोन वेगवेगळ्या दुकानदारांची बिले देण्यात आली हे विशेष. हितेंद्र टेकावडे यांनी 8 ऑक्टोबर2025 रोजी नगररचना विभागाकडे माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागितली होती. ही माहिती देण्यासाठी प्रशासनाने त्यांना 61 पानांचे 122 रुपये आणि एका पेनड्राइव्हसाठी 470 रुपये, असे एकूण 592 रुपये मनपाच्या खजिन्यात भरण्यास सांगितले. त्यांनी स्वतःचा पेनड्राइव्ह देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र प्रशासनाने ती मागणी फेटाळून लावत मनपाकडूनच पेनड्राइव्ह घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. माहितीची निकड असल्याने टेकावडे यांनी 592 रुपये भरून माहिती प्राप्त केली. एकाच पेनड्राइव्हची दोन बिले माहिती अधिकार कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या 8 जीबीचा पेनड्राइव्ह भांडार विभागाने खरेदी केलेला नाही. भांडार विभागाकडे वार्षिक खरेदी केली जाते. त्यात 16 व 32 जीबीचे पेनड्राइव्ह असतात. – दीनानाथ भामरे, प्रमुख भांडार विभाग मनपा आम्ही खरेदी केला नाही जीएसटीचे दिले. त्या पावतीनुसारडी 115 गोलाणी मार्केटमध्ये तपास केला असता या नावाचे दुकान नसल्याचे तक्रारदाराला आढळले. त्यावरून शंका आल्याने पुन्हा बिल मागितले असता त्यांना पेपरकिंग जळगाव या दुकानाचे जीसएटी नंबरसह एजी 272 या क्रमांकाचे 28 नोव्हेंबर 25 चे बिल दिले आहे. बाजारातील पेनड्राइव्हच्या किमतीत आहे मोठी तफावत माहिती मिळाल्यानंतर टेकावडे यांनी बाजारपेठेत चौकशी केली असता, त्याच कंपनीचा पेनड्राइव्ह जीएसटीसह केवळ 330 रुपयांना उपलब्ध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महापालिकेने त्यांच्याकडून 140 रुपये अतिरिक्त वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी पत्राद्वारे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट, त्यांना मयूरेश ट्रेडर्स आणि पेपर किंग जळगाव यांसारख्या विविध संस्थांच्या बिलांचा दाखला देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. पेनड्राइव्ह खरेदीदार कोण नगररचना विभागातील जनमाहिती अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार अर्जदाराने पेनड्राइव्हसह झेरॉक्स प्रतीसाठी 592 रुपये मनपा सर्वसाधारण पावती क्र.14518 ने जमा केले. नगररचनाच्या पत्रानुसार पेनड्राइव्ह भांडार विभागाने खरेदी केला आहे. भांडार विभागाच्या पत्रानुसार त्यांनी तो खरेदी केली नाही.