पुणेकरांवर कोणतीही करवाढ नाही:प्रशासनाचा 5 टक्के करवाढीचा प्रस्ताव भाजपने फेटाळला

पुणेकरांवर कोणतीही करवाढ नाही:प्रशासनाचा 5 टक्के करवाढीचा प्रस्ताव भाजपने फेटाळला
पुणे महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली ५ टक्के मिळकतकर वाढ आजच्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आली. सत्ताधारी भाजपने पुणेकरांवर कोणतीही अतिरिक्त करवाढ लादण्यास स्पष्ट नकार दिला, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पुणेकरांनी भाजपला मोठ्या विश्वासाने साथ दिली आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रशासनाने सुचवलेला करवाढीचा प्रस्ताव आम्ही फेटाळला असून, एक टक्काही करवाढ होऊ दिलेली नाही. बिडकर यांनी यावेळी ग्वाही दिली की, शहरातील विकासकामांना गती देताना नागरिकांवर कर वाढवण्याऐवजी महापालिकेच्या उत्पन्नाचे पर्यायी स्रोत मजबूत करण्यावर भर दिला जाईल. पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांना नागरिकांवर कर वाढ न करता महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी इतर कोणते पर्याय उपलब्ध आहे याबाबत आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. आगामी तीन महिन्यात याबाबत अहवाल तयार करून तो सादर करावा त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आज सांगण्यात आले आहे. मनपा आयुक्त यांनी दहा टक्के करवाडचा प्रस्ताव दिला होता तो पाच टक्क्यांवर आणला होता मात्र कोणत्याही प्रकारची करवड न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.त्यामुळे यावर्षी पुणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ केली जाणार नाही. याव्यतिरिक्त, पुणे शहरात जी समाविष्ट गावे झालेली आहे त्या संदर्भात शासनाने दिलेले आदेश, आयुक्तांचे आदेश आणि संबंधित गावाच्या समितीच्या शिफारसी याबाबत एकत्रित अहवाल तयार केला जाईल. समाविष्ट गावांच्या करवाढीचा मुद्दा विशेष सभेद्वारे मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart