Thursday, February 26, 2026
HomeNewsMartahiअमरावतीतील 552 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू:उद्यापासून प्रभाग रचना; 30 मार्चला प्रारुप यादी,...

अमरावतीतील 552 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू:उद्यापासून प्रभाग रचना; 30 मार्चला प्रारुप यादी, 13 एप्रिलपर्यंत हरकती

अमरावतीतील 552 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू:उद्यापासून प्रभाग रचना; 30 मार्चला प्रारुप यादी, 13 एप्रिलपर्यंत हरकती
अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेची निश्चिती प्रक्रिया सुरू होईल. ३० मार्च रोजी मतदार संघाचे प्रारुप घोषित केले जाईल, तर १३ एप्रिलपर्यंत या प्रारुपावर हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काळात घेतल्या जाणार आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, ज्यांचा कार्यकाळ १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान संपला आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २० फेब्रुवारीपासून तहसीलदार संबंधित ग्रामपंचायतींचे नकाशे (भौगोलिक क्षेत्र) अंतिम करण्यास सुरुवात करतील. पुढील आठवडाभरात ग्रामसेवक आणि तलाठी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून ग्रामपंचायतींच्या मतदारसंघांच्या सीमा निश्चित करतील. ५ मार्चपर्यंत मंडळ अधिकारी, बीडीओ आणि तहसीलदार यांच्या संयुक्त समितीतर्फे तलाठी व ग्रामसेवकांनी दिलेल्या अहवालाची पडताळणी केली जाईल. तयार झालेल्या मतदारसंघांच्या सीमांची माहिती संबंधित एसडीओमार्फत ११ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाईल. जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर मतदारसंघांच्या सीमांकनाची पडताळणी करून आवश्यकतेनुसार दुरुस्त्या करतील आणि अंतिम मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील. आयोगाने आखून दिलेल्या सीमेनुसार ३० मार्च रोजी प्रभाग रचनेचे प्रारुप घोषित केले जाईल. हे प्रारुप ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषद मुख्यालय आणि तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. या प्रारुपावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल असून, एसडीओ यांच्या न्यायालयात २३ एप्रिलपर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतींच्या मतदारसंघांची रचना अंतिम टप्प्यात येईल. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत २८ एप्रिलपर्यंत ती राज्य निवडणूक आयोगाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. अशा प्रकारे मतदारसंघ रचनेची प्रक्रिया एप्रिलअखेर पूर्ण होईल. राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी ४ मे रोजी सर्व ५५२ ग्रामपंचायतींच्या मतदारसंघांची अंतिम प्रभागरचना घोषित करतील.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring