या दिवशी घराच्या अंगणात लावा तुळशीचं रोपं, हमखास लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळेल – Marathi News | You can plant a basil plant in your yard on this present day

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पूजनीय स्थान आणि महत्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीची पूजा केल्याने घरात सुख-शांतीसह लक्ष्मीदेवीचा वास सदैव राहतो. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिवशी किंवा चुकीच्या दिशेने तुळस लावल्याने जीवनात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. तर आजच्य या लेखात तुळस लावण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे ते आपण जाणून घेऊयात.

तुळशीचं रोपं कोणत्या दिवशी लावावे?

तुम्हाला जर घरी तुळस लावायची असेल तर गुरुवार हा शुभ दिवस मानला जातो कारण तो भगवान विष्णूंना समर्पित असतो. धार्मिक श्रद्धेनुसार गुरुवारी तुळस लावल्याने कुटुंबातील सदस्यांवर विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे घरात शांती आणि आनंद येतो.

याव्यतिरिक्त शुक्रवार हा तुळस लावण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी घरात तुळस लावल्याने आपल्याला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळते आणि घरात लक्ष्मी मातेचं आगमन
होते.

तसेच कार्तिक महिना देखील तुळस लावण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या महिन्यात तुळस लावल्याने शुभ फळं मिळतात आणि घरात आनंद येतो.

तुळशी कोणत्या दिशेला लावावी?

तुळशीचे रोप घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे. वास्तुनुसार ही दिशा देवांचे निवासस्थान मानली जाते. म्हणून या दिशेला तुळस लावल्याने व्यक्तीच्या जीवनात शुभ फळे मिळण्यास सुरूवात होते.

याशिवाय, तुळशीचे रोप पूर्वेकडेही लावता येते.

एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे दक्षिण दिशेला तुळस लावू नये. ही दिशा यमाची दिशा मानली जाते. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

तुळशीचे नियम

  • चुकूनही तुळशीजवळ बूट, चप्पल किंवा झाडू ठेवू नये.
  • याशिवाय तुळशीच्या रोपाजवळील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
  • दररोज सकाळी आणि संध्याकाळी झाडासमोर तुपाचा दिवा लावा.
  • खराब हातांनी तुळशीला स्पर्श करू नका.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart