
दिवसभर राबराब राबणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला आपल्या घरापुढे एक सुंदर आणि मस्त कार उभी असावी असे वाटते. कारमध्ये बसून संपूर्ण कुटुंबाला मस्तपैकी फिरायला न्यावं, असंही अनेकांचं स्वप्न आहे. परंतु काही कार फारच महाग असतात. म्हणूनच अनेकांचे हे स्वप्न आजही अधुरेच आहे.
परंतु टाटा मोटार्सच्या या कारमुळे तुमचे स्वत:ची कार असण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंटही कमी लागेल. ईएमआयदेखील तुम्हाला कमी येऊ शकतो. या कारचे नाव टाटा पंच असे आहे.
टाटा पंच या कारचे एकूण 31 वेगवेगळे व्हेरिएंट आहेत. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 5.59 लाख रुपये आहे. तर या कारचे टॉप मॉडेल 12.54 लाख रुपये आहे. टाटाच्या टॉप मॉडेलचे नाव Accomplished Plus S CNG AMT असे आहे. या कारची मूळ किंमत 10.54 लाख रुपये आहे.
परंतु या कारची ऑन रोड किंमत 12.54 लाख रुपये आहे. तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी 80 हजार रुपये डाऊन पेमेंट केले आणि उर्वरित कर्ज काढले तर त्यावर तुम्हाला 9.8 टक्क्यांनी व्याज लागेल. या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी पाच वर्षे असेल तर 24 हजार 140 रुपये ईएमआय असेल.
तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी सहा वर्षाची मुदत घेतली असेल तर तुम्हाला 21,031 रुपयांचा ईएमआय येईल. हेच कर्ज सात वर्षांच्या परतफेडीच्या मुदतीवर असेल तर तुम्हाला 18,831 रुपये ईएमआय येईल.



