Home - Martahi - बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करण्याची मागणी
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करण्याची मागणी
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करण्याची मागणी
चेंबूर, ता. १८ (बातमीदार) : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या सन्मानार्थ ‘विशेष टपाल तिकीट’ जारी करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना लेखी निवेदन देत ही मागणी केली. या निवेदनाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय पटलावर महत्त्वाची छाप पाडली. हिंदुत्ववादी लोकनेता, व्यंगचित्रकार आणि प्रभावी वक्ते म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या लेखणी, भाषण आणि व्यंगचित्रांमधून सामान्य माणसात स्वाभिमानाची भावना जागृत झाली, असे शेवाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. ता. २७ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष टपाल तिकीट जारी करून केंद्र सरकारने यथोचित सन्मान करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();