Home - Martahi - घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील गटाराचे चेंबर खचले;
घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील गटाराचे चेंबर खचले;
घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील गटाराचे चेंबर खचले; अपघाताचा धोका वाढला
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) : घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील भीमनगर चौकातून जागृतीनगर मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर गटाराचे चेंबर खचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी तीव्र वाहतूक कोंडी होत आहे.
चेंबर खचल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वार व अन्य वाहनचालकांना अचानक अडथळा निर्माण होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, हा मार्ग मुंबई महानगरपालिकाच्या अखत्यारीत येत असून, तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे वाहनचालक सुनील चव्हाण यांनी सांगितले. संबंधित प्रशासनाने वेळीच कारवाई करून संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();