
कार्यकाळ संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. आगामी शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेची निश्चिती सुरु होईल. दरम्यान ३० मार्चला मतदार संघाचे प्रारुप घोषित केले जाणार असून १३ एप्रिलपर्यंत या प्रारुपावर हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काळात घेतल्या जाणार आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींचा समावेश असून या सर्व ग्रापंचा कार्यकाळ १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान संपुष्टात आला. आयोगाच्या वेळापत्रकानुसार आगामी शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून तहसीलदार त्या-त्या ग्रामपंचायतींचे नकाशे (भौगोलिक क्षेत्र) अंतीम करण्यास प्रारंभ करतील. पुढील आठवडाभरात ग्रामसेवक आणि तलाठी प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन ग्रामपंचायतींच्या मतदारसंघांच्या परिसीमा निश्चित करतील. पुढे ५ मार्चपर्यंतच्या काळात मंडळ अधिकारी, बीडीओ आणि तहसीलदार या तीन अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीतर्फे तलाठी व ग्रामसेवकाने दिलेल्या अहवालाची पडताळणी केली जाईल. अशाप्रकारे तयार झालेल्या मतदारसंघांच्या सीमांची माहिती त्या-त्या एसडीओमार्फत ११ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या सुपुर्द केला जाईल. जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर पुन्हा मतदारसंघांच्या सीमांकनांची पडताळणी करुन आवश्यकता वाटल्यास त्यात योग्य त्या दुरुस्त्या करतील आणि अंतिमत: तयार झालेला मसौदा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाने आखून दिलेल्या सीमेनुसार ३० मार्चरोजी प्रभाग रचनेचे प्रारुप घोषित केले जाईल. हे प्रारुप ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषद मुख्यालय व तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करुन दिले जाणार असून त्यावर नागरिकांमार्फत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. अशा सूचना व हरकती दाखल करण्यासाठी १३ एप्रिल ही शेवटची तारीख असून एसडीओ यांच्या न्यायालयात २३ एप्रिलपर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. एकदा सुनावणी संपली की ग्रामपंचायतींच्या मतदारसंघांची रचना अंतिमतेकडे वळणार असून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत २८ एप्रिलपर्यंत ती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आहे. मतदार यादीची घोषणा मे महिण्य अशाप्रकारे पूर्ण झालेला मतदारसंघ रचनेचा प्रवास एप्रिलअखेर संपुष्टात येणार असून राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या नात्याने ४ मे रोजी जिल्हाधिकारी सर्व ५५२ ग्रामपंचायतींच्या मतदारसंघांची प्रभागरचना घोषित करणार. प्रभागरचना प्रारंभाचा दिवस २० फेब्रुवारी प्रभाग रचनेच्या प्रारुपाची घोषणा ३० मार्च हरकती घेण्याचा शेवटचा दिवस १३ एप्रिल सुनावणीची शेवटची तारीख २३ एप्रिल अंतिम प्रभाग रचनेची घोषणा ४ मे