
आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाकडून राबवण्यात येते. यंदा शाळांची नोंदणी जानेवारी महिन्यात झाली असून २०६ शाळांनी नोंदणी केली. विशेष म्हणजे यावर्षी लातूर येथील नामांकित दोन शाळा अल्पसंख्याक दर्जा आणि स्थलांतर झाल्याने कमी झाल्या. गेली तीन वर्षात १२ शाळा कमी झाल्या आहेत. गतवर्षी २०८ शाळेत २ हजार १५७ जागेवर प्रवेश प्रक्रिया पार पडली. यंदा मात्र शाळा कमी झाल्या असल्या तरी ९४ जागा वाढल्या असून २ हजार २५१ जागांवर प्रवेश मिळवण्याची अर्जाची भरण्यास १७ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. दोन दिवसात ६३८ अर्ज दाखल झाले असले तरी पालकांमध्ये पसंतीच्या शाळा कमी होत असल्याची चिंता वाढली आहे. दरम्यान शिक्षण विभागाच्या वतीने योग्य माहितीसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. आरटीई प्रवेशासाठी २०२४ साली जवळपास ४०० जागा रिक्त राहिल्या होत्या. गतवर्षी पाचवी यादी जाहीर करून शेवटच्या ३२ जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यंदाही अर्ज दाखल करण्यासाठी पालकांना सूचित करण्यात आले असून अद्याप १९१ अर्ज प्राप्त स्वीकार झाले आहेत. ^पालकांनी आपल्या पाल्याची चुकीची कागदपत्र सादर करू नये. योग्य माहिती भरावी. नोंदणीकृत शाळांनी शासनाच्या नियम आणि निर्देशाचे पालन करूनच प्रवेश प्रक्रिया पार पाडावी. टाळाटाळ करू नये. नामांकित शाळा कमी झाल्यास विद्यार्थी संख्येत फरक जाणवतो. सध्या नवीन निकषामुळे एक किलोमीटरच्या आतल्या शाळांमध्येच प्रवेश मिळवता येणार असल्याने शंभर टक्के जागांवर प्रवेश होतील. तृप्ती अंधारे, प्र. शिक्षणाधिकारी. एकूण आलेले अर्ज : ६३८ पालकांकडून प्रकियाधिन अर्ज : ४३७ स्वीकार झालेले अर्ज : १९१ आहेत. एकूण इंटक : ६७४८ आरटीईतील एकूण जागा : २२५१ कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून पडताळणीही करण्यात येते. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. यामध्ये प्रथमतः शाळांची नोंदणी होते. पुन्हा विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी नोंदणीची प्रकिया पार पडते. या दाखल अर्जावर लॉटरी काढून विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर केले जातात. लॉटरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना निवडीचे संदेश पाठविले जातात. त्यांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करुन संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावे लागतात. विद्यार्थ्यांसाठी कोटा सूचनांचे पालन करावे यंदाची अर्जाची आकडेवारी