होळीच्या सुट्ट्यांचे गणित फिस्कटले?
Bank Holiday On Holi: होळीची अधिकृत सुट्टी 3 मार्चला की 4 मार्चला, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. मात्र आता चित्र स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च 2026 मधील बँक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली असून त्यानुसार विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
आरबीआयने ‘March Bank Holiday 2026’ ची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत राष्ट्रीय आणि प्रादेशिक सणांनुसार बँक शाखा कोणत्या तारखांना बंद राहतील, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सर्व राज्यांमध्ये सुट्ट्या एकसारख्या नसल्याने ग्राहकांनी आपल्या शहरानुसार तारखा तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सोमवार, 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन निमित्त काही शहरांत बँका बंद राहतील.
- मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी धुलिवंदनामुळे अनेक मोठ्या शहरांत बँकांना सुट्टी असेल.
- बुधवार, 4 मार्च 2026 रोजी उत्तर व मध्य भारतातील अनेक भागांत होळी निमित्त बँका बंद राहणार आहेत.
- 2 मार्च रोजी कानपूर आणि लखनऊसारख्या काही शहरांत बँका बंद राहतील, तर इतर ठिकाणी कामकाज सुरळीत सुरू राहील.
- 3 मार्च रोजी मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, रांची, भोपाळ, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद, नागपूर, पणजी, बेलापूर आणि विजयवाडा येथे बँका बंद राहतील.
- 4 मार्च रोजी नवी दिल्ली, अहमदाबाद, लखनऊ, कानपूर, पाटणा, रांची, चंदीगड, शिमला, जम्मू, रायपूर, भुवनेश्वर, अगरतळा, इटानगर, शिलाँग आणि इम्फाळ येथे बँका बंद राहतील.
Holi Rules In Mumbai : मुंबईकरांनो सावधान! होळीसाठी पोलिसांची कडक नियमावली; एक चूक पडू शकते महागात
बँक ग्राहक, व्यापारी, उद्योगधंदे करणारे तसेच शासकीय कामांसाठी बँक व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर या सुट्ट्यांचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आगाऊ नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
होळी आणि संबंधित सण विविध राज्यांत वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात. त्यामुळे प्रादेशिक परंपरा आणि स्थानिक सणांच्या आधारे बँक सुट्ट्या जाहीर केल्या जातात. यामुळे प्रत्येक राज्यात सुट्टीची तारीख वेगळी असू शकते.
जर या आठवड्यात तुमचे बँकिंगशी संबंधित काम असेल, तर आपल्या शहरातील बँक सुट्टीची अचूक तारीख तपासूनच व्यवहाराचे नियोजन करावे. ऑनलाईन बँकिंग सेवा उपलब्ध राहतील, मात्र शाखांमधील व्यवहार सुट्टीच्या दिवशी बंद असतील.
दरम्यान, होळीनंतरही मार्च महिन्यात अनेक सणांमुळे बँकांना सुट्ट्या असतील. 13 मार्च रोजी काही राज्यांत छपचार कुट, 17 मार्चला शब-ए-कद्र (जम्मू-काश्मीर), 18 मार्चला गुढी पाडवा व उगादी, 20-21 मार्चला ईद-उल-फित्र, 26-27 मार्चला राम नवमी तसेच 31 मार्चला काही ठिकाणी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
होळीच्या सुट्ट्यांबाबतचा संभ्रम दूर झाला असून नागरिकांनी आपल्या बँकिंग कामांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.