सोसायटीत हॉर्न वाजवण्यावरून ज्येष्ठाला मारहाण:बुलेट चालकासह साथीदारांविरुद्ध स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल

सोसायटीत हॉर्न वाजवण्यावरून ज्येष्ठाला मारहाण:बुलेट चालकासह साथीदारांविरुद्ध स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल
स्वारगेटमधील महर्षीनगर भागात सोसायटीच्या आवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला बॅट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बुलेट चालकासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नुकतीच घडली असून, पीडित ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक महर्षीनगर येथील एका सोसायटीत राहतात. आरोपी बुलेट चालक सोसायटीच्या आवारात आला आणि त्याने मोठ्या आवाजात हॉर्न वाजवला. बुलेटच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे त्रासलेल्या ज्येष्ठांनी याबद्दल विचारणा केली असता, बुलेट चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बुलेट चालक आणि त्याचे साथीदार पुन्हा सोसायटीच्या आवारात आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला पुन्हा शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी अलीकडेच बुलेटला बसविण्यात आलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखा कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या १५० बुलेट चालकांविरुद्ध कारवाई केली होती. बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती, ज्यात विरुद्ध दिशेने जाणारे आणि ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई करून वाहने जप्त करण्यात आली होती. खरेदी करणाऱ्या महिलेच्या पिशवीतून दागिने चोरी पुण्यातील रविवार पेठेतील एका दुकानात खरेदी करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महात्मा फुले पेठेत राहायला आहेत. त्या रविवार पेठेत बहिणीसह खरेदीसाठी आल्या होत्या. एका दुकानात त्या खरेदी करत होत्या. त्या वेळी त्यांच्या पिशवीतून चोरट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोकड असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस हवालदार हर्षल दुडम तपास करत आहेत.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart