सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर| Gold Price Today Gold and Silver Rates Drop in Jalgaons Gold Market 1 Tola Gold at Rs 1 Lakh 58 thousand| Saam Tv News

जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या काही दिवसांच्या मोठ्या दरवाढीनंतर आता सोन्या-चांदीचे भाव स्थिरावले आहेत. सध्या सोन्याचा भाव जीएसटीसह १ लाख ५८ हजार रुपयांवर पोहोचलाय. तर चांदी २ लाख ५५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. चांदीच्या दरात काहीशी घट झाल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जळगावमध्ये २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४१,६१० रुपयांवर गेले आहे तर २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,५४,६०० रुपयांवर गेले आहे.

दरम्यान, गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २२९० रुपयांनी वाढले. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं २१०० रुपयांनी आणि १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १७२० रुपयांनी वाढले. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात १५ रुपयांनी वाढ झाली. तर १ किलो चांदी १५००० रुपयांनी वाढली.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart