Thursday, February 26, 2026
HomeNewsMartahiसाहित्यिक हा लोककलेचा आत्मा ः रघुवीर खेडकर

साहित्यिक हा लोककलेचा आत्मा ः रघुवीर खेडकर

पिंपरी, ता. १९ ः ‘साहित्यिक हा लोककलेचा आत्मा आहे. आम्ही कलावंत साहित्यिकांच्या शब्दांना कलेच्या माध्यमातून जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच साहित्यिकांनी केलेला हा लोककलेचा सन्मान माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे,’ असे उद्‍गार ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी मांडले.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे व अध्यक्ष संदीप तापकीर यांच्या हस्ते रघुवीर खेडकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना खेडकर बोलत होते. मागील वीस वर्षांपासून मोशी गावच्या यात्रेमध्ये सातत्याने तमाशाचे खेळ होत असतात. म्हणून आवर्जून तमाशाच्या मंचावरच त्यांचा सत्कार करण्यात आला. मोशी ही संतभूमी असल्याने सत्कारावेळी संतपरंपरेचे उपरणे, तुकाराम पगडी आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. या सत्कार सोहळ्याला रामभाऊ सासवडे, ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, दादाभाऊ गावडे, डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, गणेश सस्ते, वंदना आल्हाट, काळुराम दामू सस्ते, सुनील जाधव सस्ते, महीपत साठे, अलंकार हिंगे, सचिन कामठे, अमर कांदे इत्यादी उपस्थित होते.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring