Tuesday, March 17, 2026
HomeNewsMartahiसाताऱ्यात खेळाडूंना मिळणार 'आंतरराष्ट्रीय' बळ:रक्षा खडसे आणि उदयनराजे भोसले यांच्यात 'जलमंदिर'वर महत्त्वपूर्ण...

साताऱ्यात खेळाडूंना मिळणार 'आंतरराष्ट्रीय' बळ:रक्षा खडसे आणि उदयनराजे भोसले यांच्यात 'जलमंदिर'वर महत्त्वपूर्ण चर्चा

साताऱ्यात खेळाडूंना मिळणार 'आंतरराष्ट्रीय' बळ:रक्षा खडसे आणि उदयनराजे भोसले यांच्यात 'जलमंदिर'वर महत्त्वपूर्ण चर्चा
केंद्रीय क्रीडा राज्य व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी गुरुवारी सातारा जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये सातारा शहरात अद्ययावत क्रीडा सुविधा व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा प्रशिक्षक उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उभयतांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंडोर बास्केट बॉल स्टेडियम व धनुर्विद्या प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रस्ताव यावेळी खडसे यांना देण्यात आला. सातारा जिल्ह्यामध्ये शिवजयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. सातारा शहरांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय राज्य व क्रीडातथा युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे या आवर्जून उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर खडसे यांनी खा उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे सदिच्छा भेट घेतली. साताऱ्यामध्ये इनडोअर बास्केटबॉल तसेच धनुर्विद्या खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशी विनंती यावेळी उदयनराजे भोसले यांनी केली. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या माध्यमातून पात्र प्रशिक्षकांची नियुक्ती साताऱ्यात करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील प्रतिभावान स्थानिक प्रशिक्षकांना सक्षम प्रशिक्षण व संधी देऊन क्रीडा सुविधांचा दर्जा उंचवण्यासाठी सुमारे पाऊण तास चर्चा झाली साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासन स्तरावर सहकार्य मिळावे अशी अपेक्षा यावेळी उदयनराजे यांनी व्यक्त केली. या सर्व मागण्यांच्या संदर्भाने केंद्र शासनाच्या वतीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या आश्वासन रक्षा खडसे यांनी दिले.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments