सकाळ संवाद

पुनावळे भागात दूषित पाणीपुरवठा

पुनावळे भागातील गायकवाडनगर येथे मागील एक महिन्यापासून दूषित, अस्वच्छ आणि गाळ मिश्रित पिण्याचे पाणी येत आहे. या दूषित पाण्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे उलटी, जुलाब यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याचा त्रास लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या पाण्याचे परीक्षण करून परिसरात स्वच्छ पाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

– एक नागरिक, पुनावळे

बेवारस वाहनांचा त्रास

मासुळकर कॉलनी येथील प्रवेशव्दारावर मागील सहा महिन्यापासून बेवारस चारचाकी उभी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. हे वाहन कोणाचे आहे याची परिसरातील नागरिकांना कल्पना नाही. या वाहनाबाबत अनेक वेळा तक्रार करूनही अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने या वाहनावर योग्य ती कारवाई करून हे वाहन येथून हटवावे.

– अमित रोडे, रहिवासी, मासुळकर कॉलनी

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart