Wednesday, March 18, 2026
HomeNewsMartahiसंभाजीनगर मनपात विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे समीर बिल्डर:उच्चशिक्षित, आक्रमक सदस्याला पक्षाने दिली संधी

संभाजीनगर मनपात विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे समीर बिल्डर:उच्चशिक्षित, आक्रमक सदस्याला पक्षाने दिली संधी

संभाजीनगर मनपात विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे समीर बिल्डर:उच्चशिक्षित, आक्रमक सदस्याला पक्षाने दिली संधी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, एमआयएमने जुन्या जाणत्यांना बाजूला सारत प्रभाग क्रमांक पाचमधून विजयी झालेले नगरसेवक समीर साजेद बिल्डर यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ घातली आहे. वडिलांचा राजकीय वारसा आणि एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेले समीर बिल्डर आता महापालिकेत सत्ताधाऱ्यांविरुद्ध शड्डू ठोकणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे वडील साजेद बिल्डर मनपात स्थायी समितीचे सभापती होते. एमआयएमने यंदा २२ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. माजी विरोधी पक्षनेते साजेद बिल्डर यांचा मुलगा असलेल्या समीर यांनी गेल्या १५ वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम केले आहे. त्याचे एमबीए मार्केटिंगपर्यंत शिक्षण झालेले आहे. उच्चशिक्षित चेहरा असलेले समीर बिल्डर आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जातात. पदभार स्वीकारल्यानंतर समीर बिल्डर यांनी आपले प्राधान्य स्पष्ट केले. शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले पाणी, कचरा कोंडी, महापालिका शाळांचा दर्जा आणि आरोग्य सुविधा यांवर ते विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत. शहरातील मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल, असे त्यांनी सांगितले.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments