संभाजीनगरात प्रथमच ‘डीजे’मुक्त शिवजयंती:डीजे वापरल्यास आयोजकासह मालकावर गुन्हे, पोलिस कठोर ॲक्शन घेणार

संभाजीनगरात प्रथमच ‘डीजे’मुक्त शिवजयंती:डीजे वापरल्यास आयोजकासह मालकावर गुन्हे, पोलिस कठोर ॲक्शन घेणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात प्रथमच डीजेमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेला राजकीय नेते आणि विविध शिवजयंती मंडळांच्या अध्यक्षांनीही पाठिंबा दर्शवला. त्यामुळे यंदा डीजेच्या दणदणाटाऐवजी ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. मिरवणुकीत कोणी डीजे किंवा डॉल्बी सिस्टिम आणली तर केवळ डीजे जप्त करून पोलिस थांबणार नाहीत. संबंधित डीजे मालक आणि मंडळाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल होतील, असे पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीनंतर शहर पोलिसांनी तातडीने डीजेचालक व ऑपरेटर्सची स्वतंत्र बैठक घेतली. हायकोर्टाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणाचे नियम अत्यंत कठोरपणे पाळण्याचे निर्देश या वेळी दिले. या निर्णयामुळे यंदा शिवजयंतीला पारंपरिक वाद्यांच्या गजरासह सांस्कृतिकचे दर्शन घडेल. पोलिस कठोर ॲक्शन घेणार शहरात कोठेही डीजे वाजवून ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडले जात असतील तर नागरिकांनी तत्काळ ‘डायल ११२’वर माहिती द्यावी. याशिवाय नागरिक थेट माझ्या वैयक्तिक व्हॉट्सॲप नंबर ९२२६५१४००१ देखील तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. – प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart