Thursday, March 19, 2026
HomeNewsMartahi‘शिवशंभू गर्जना’ने सूर-तालातून महाराष्ट्राची संस्कृती:गौरवशाली इतिहासाचा केला जागर, रसिकांचा प्रतिसाद; कलावंतांचा करण्यात...

‘शिवशंभू गर्जना’ने सूर-तालातून महाराष्ट्राची संस्कृती:गौरवशाली इतिहासाचा केला जागर, रसिकांचा प्रतिसाद; कलावंतांचा करण्यात आला सत्कार‎

‘शिवशंभू गर्जना’ने सूर-तालातून महाराष्ट्राची संस्कृती:गौरवशाली इतिहासाचा केला जागर, रसिकांचा प्रतिसाद; कलावंतांचा करण्यात आला सत्कार‎

नरनाळा महोत्सवात “शिवशंभू गर्जना’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जागवला. वीर रसपूर्ण गाणी आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांमध्येही उत्साह, जोश संचारला. उपस्थितांनीही दोन्ही हात उंचावून, उभे राहून कलावंतांच्या सुरात सूर मिसळून, स्वतः नाचून

.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात निसर्गाधारित पर्यटन उपक्रम, “मॅराथॉन-एक धाव संवर्धनासाठी’, चित्रकला स्पर्धा, पाक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात अभिजित व अमू जाधव यांचा ’शिवशंभू गर्जना’, त्यानंतर इंडियन आयडॉल विनर सलमान अली यांची लाइव्ह कॉन्सर्ट हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी आ. वसंत खंडेलवाल, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अप्पर आयुक्त सूरज वाघमारे, उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण व कलावंतांचा गौरव झाला. निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणे व मानव आणि पर्यावरण यांच्यातील नाते दृढ करणे हा महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. ऐतिहासिक महात्म्य लाभलेला नरनाळा किल्ला व मेळघाटचे समृद्ध जंगल हे अकोला जिल्ह्याचे गौरवस्थान आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments