शिवजयंती मिरवणुकीची तीसहून अधिक वर्षांची परंपरा:सात हजार विद्यार्थी मावळे, 40 घोडे अन् पारंपारिक वाद्यांचा होणार गजर

शिवजयंती मिरवणुकीची तीसहून अधिक वर्षांची परंपरा:सात हजार विद्यार्थी मावळे, 40 घोडे अन् पारंपारिक वाद्यांचा होणार गजर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पारंपारिक मिरवणुकीत ७ हजारहून अधिक विद्यार्थी, १५० शिक्षक, ४० घोडे, ७ पारंपरिक वाद्यपथके, हे मुख्य आकर्षण असणार आहेत. तीन दशकांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या मिरवणुकीद्वारे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडणार आहे. तसेच महाविद्यालयात छत्रपती शिवरायांच्या सर्वात मोठ्या प्रतिमेचे अनावरण केले जाणार आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे रेसिडेन्शिअल माध्यमिक विद्यालय या मिरवणुकीचे मुख्य आयोजक आहेत. संस्थेच्या १२ महाविद्यालयात शिकणारे सुमारे ७ हजारहून अधिक विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सकाळी ८:३० वाजता माळीवाडा बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मिरवणुक सुरु होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त आदी उपस्थित असतील. मिरवणुकीत सर्वात पुढे ४ विद्यार्थी मिरवणुकीचा नामफलक, त्यांच्यामागे १०० विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, ५० मावळे व ५० नऊवारी साड्या घातलेल्या मुलींचे सावित्रीच्या लेकी पथक, चित्ररथ, २० विद्यार्थ्यांचे शेतकरी पथक, शिवरायांची शौर्यगाथा सांगणारे ५५ मुलांचे पथक मिरवणुकीत असणार आहे. मिरवणुकीतील आकर्षण मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी असेल. मिरवणुकीत पारंपारिक क्रीडा प्रकारांची माहिती देणारे खेळाडूंचे पथक, मानवी मनोरा सादर करणारे विद्यार्थी, पर्यावरण जनजागृती करणारी सोलार कार, अध्यात्माची परंपरा सांगणारे वारकरी व छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा शिवरथ हे आकर्षण असेल. मिरवणुकीनंतर सर्वात मोठ्या शिवप्रतिमेचे अनावरण केले जाणार आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart