शिवजयंतीनिमित्त अभिवादन:अकोट येथे 40 क्विंटल रांगोळीतून 30 हजार ‎चौरस फूट जागेवर साकारली शिवरायांची प्रतिमा‎

शिवजयंतीनिमित्त अभिवादन:अकोट येथे 40 क्विंटल रांगोळीतून 30 हजार ‎चौरस फूट जागेवर साकारली शिवरायांची प्रतिमा‎
अकोट येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे‎छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे.‎यंदा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ३० हजार चौरस फूट रांगोळीतून‎साकारण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होय.‎शिवरायांची प्रतिमा रांगोळीतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे‎व चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून‎साकारण्यात आली आहे.‎ अशी साकारली रांगोळी सर्वप्रथम मैदानाची आखणी‎करण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचे‎रेखाटन करण्यात आले व नंतर‎४० क्विंटल रांगोळी टाकण्यात‎आली. महाराज सिंहासनावर‎विराजमान आहेत, असा हा‎देखावा या प्रतिमेतून दिसून येतो.‎ही प्रतिमा साकारण्याकरिता‎महाविद्यालयाचे विद्यार्थी,‎चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी व‎महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी‎गेल्या परिश्रम घेतले.‎ शिवजयंतीनिमित्त प्रशासनातर्फे आज पदयात्रा‎ जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा‎अधिकारी कार्यालयातर्फे छत्रपती‎शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९‎फेबुवारीला सकाळी ७.३० वाजता‎अकोल्यातील पं. लालबहादूर‎शास्त्री क्रीडांगण येथून पदयात्रेचे‎आयोजन करण्यात येत आहे. ही‎पदयात्रा अकोला बसस्थानक‎चौक, अशोक वाटिका चौक मार्गे‎येऊन नियोजनभवन,‎जिल्हाधिकारी कार्यालय येथे‎समारोप करण्यात येणार आहे.‎

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart