
घराघरापासून चौकाचौकातील मित्र मंडळांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जल्लोष पूर्वसंध्येपासूनच सुरू झाला होता. मंडळांमधील सजावट दरवर्षाप्रमाणे आहेच. मात्र घराघरांमध्येही शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊंची ड्रेपरी करून त्याचे रिल्स सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेण्ड यंदा वाढला आहे. एकूणच शिवजयंतीला ड्रेपरी, फेटे, झेंडे, ढोल, शूटिंग, रोषणाई, मिरवणूक आणि सेलिब्रेशनची उलाढाल १२ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या वर्षी ५ ते ६ कोटींची उलाढाल झाली होती. यंदा दुपटीने वाढली आहे. शहरात आठ दिवसांत साडेपाच लाखांहून अधिक छोटे-मोठे भगवे ध्वज विक्री झाले आहेत. भगव्या झेंड्यावर महाराजांची प्रतिमा असलेले झेंडे जागोजागी लागल्याने शहरातील शिवजयंतीचा उत्साह डोळ्यांचे पारणे फेडत आहे. झेंड्यांसोबतच भगव्या टोप्या, कॅप, टी शर्ट्स, साड्या, पायजमा शर्ट, जॅकेटस्, फेटे यांचीही मोठी क्रेझ पाहायला मिळत असल्याचे कापड विक्रेता असोसिएशनने सांगितले. आठ दिवसांपासून याच्या विक्रीत पन्नास टक्के वाढ झाली आहे. यासोबत मंडप, साउड, गुलाल, मेकअप, टॅटू, फुले, फ्लेक्स अशी सगळी उलाढाल साधारण १२ कोटींपर्यंत गेली आहे. पारंपरिक मार्गावर पोलिस बंदोबस्त मिरवणूक मार्ग : वाकडी बारव, दूधबाजार, गाडगे महाराज चौक, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डमार्गे पंचवटी कारंजा ते गोदाकाठ असा मिरवणूक मार्ग दादा भुसे आणि गिरीश महाजनांची उपस्थिती गगनाला भिडणारे देखावे, मावळ्यांच्च्या वंशजांची उपस्थिती, यंदाच्या शिवजयंतीचे आकर्षण पंचवटी कारंजा : २० फुटी एलइडी स्क्रीनवर चलचित्र अशोकस्तंभ : ४५ फूट उंच शिवरायांची मूर्ती, ३७ मावळ्यांच्या वंशजांची उपस्थिती यंदाचे आकर्षण आहे. नाशिकरोड : ४० फूट उंच भगवान शंकरांचा देखावा देवळाली कॅम्प : ६० फूट उंच शिवराज्याभिषेक सोहळा देखावा आणि आकर्षक विद्युत रोषणाई