वेरूळच्या मालोजीराजे भोसले गढीवर शिवजयंतीनिमित्त ग्रामस्थांचे अभिवादन:सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात

वेरूळच्या मालोजीराजे भोसले गढीवर शिवजयंतीनिमित्त ग्रामस्थांचे अभिवादन:सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात
प्रतिनिधी |वेरूळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक कर्मभूमी आणि शहाजीराजे भोसले यांचे जन्मस्थान असलेल्या वेरूळ येथील गढीवर १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. उत्सवाची सुरुवात गढीवर भगवा ध्वज फडकवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शिवजयंती निमित्त संपूर्ण गढी परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, तो आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आला होता. स्थानिक शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिववंदना आणि महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. वेरूळ हे भोसले घराण्याचे मूळ गाव असल्याने, या ठिकाणच्या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या गढीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून, त्या कामाचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवप्रेमी संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart