
बहुचर्चित ७६,२२० कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेने आता निर्णायक वळण घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत अधिकृत नुकसान भरपाईचे दर जाहीर केले असून, पालघर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीसाठी सरासरी प्रति हेक्टर बाजारभावापेक्षा ३ ते ४ पटीने जास्त म्हणजे २ कोटी रुपयांहून अधिक मोबदला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विक्रमी मोबदल्यामागे त्रिस्तरीय सूत्र मूळ दर : पालघरमधील जमिनीचा मूळ दर ६२.५० लाख रुपये प्रति हेक्टर धरला. दुप्पट गुणांक : ग्रामीण भागातील भूसंपादनासाठी हा दर थेट दुप्पट करून १.२५ कोटी केला जातो. १००% भरपाई रक्कम : या १.२५ कोटींवर पुन्हा १००% अतिरिक्त सन्मान राशी देऊन अंतिम आकडा २.५० कोटींवर पोहोचू शकतो.
व्याज: २९ ऑगस्ट २०२४ पासून मिळणारे १२% वार्षिक व्याज हा या पॅकेजमधील मोठा बोनस ठरेल.
सरासरी बाजार भाव : पालघर, डहाणू परिसरात बाजारभाव दर हेक्टरी ४० लाख ते ८० लाख रुपये आहे.
प्रशासकीय मोबदला : नवीन दरांनुसार प्रति हेक्टरी २.५० कोटी ते ४.८८ कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळेल.
मोबदल्यातील तफावत: बाजारभावापेक्षा सरकारी दर ३ ते ४ पट अधिक आहे.