वडगाव मावळ, ता. २० : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वडगावसह पंचक्रोशीतील साते, ब्राम्हणवाडी, मोहितेवाडी, सांगवी, कातवी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी वडगाव येथे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू समाजाच्या ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात रविवारी (ता. २२) होणाऱ्या या संमेलनात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ग्रामप्रदक्षिणा, ६ वाजता ध्वजारोहण व दीप प्रज्वलन, ६.३० वाजता गो माता पूजन, रात्री ७ ते ७.१५ वाजता मातृशक्ती विषय, पंच परिवर्तन, ७.३० वाजता चैतन्य महाराज वाडेकर यांचे आशीर्वचन होईल व त्यानंतर शिवराज ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त हिंदू बंधू भगिनींनी या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाज वडगाव मावळच्या वतीने करण्यात आले आहे.
—