Thursday, February 26, 2026
HomeNewsMartahiरोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

अजित पवारांचा अपघात की घातपात… याबद्दल राज्यभरातून संशय व्यक्त केला जात असतानाच आता रोहित पवारांनी पुरावे आणि तथ्य समोर ठेवून आरोपांची मालिकाच सुरु केलीय…त्यामुळेच रोहित पवारांची काळजी वाटत असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.. खुद्द रोहित पवार यांनीही आपण दादांच्या मृत्यूबद्दलच तथ्य आणि पुरावे समोर मांडत असल्यानं कुटुंबाला भीती वाटत असल्याचं जाहीरपणे पत्रकार परिषदेत म्हटंल होत..

आता पवार कुटुंबातूनही रोहित पवार यांच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त करण्यात आल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी केलीय.. दुसरीकडे सरकारतर्फे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवारांच्या सुरक्षेवर भाष्य केलंय.. पोलीस संरक्षणाची गरज असेल तर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलेत.. मात्र ज्या नेत्यांना सुरक्षेची गरज आहे… त्यांना सरकारतर्फे कोणती सुरक्षा दिली जाते…

X सुरक्षा- यामध्ये 2 सशस्त्र पोलीसांचा समावेश असतो… महाराष्ट्रातील बहुतांश आमदारांना X सुरक्षा दिलेली आहे…

Y सुरक्षा- यामध्ये 8-11 पोलीस असतात.. त्याबरोबरच 1 किंवा 2 कमांडोही सुरक्षेसाठी तैनात असतात

Y+ सुरक्षा- यात 2-4 कमांडो आणि 8 ते 11 सुरक्षा रक्षक असतात. ही सुरक्षा कॅबिनेट मंत्री आणि महत्वाच्या नेत्यांना दिली जाते

Z सुरक्षा- या श्रेणीत 4-6 कमांडोसह 22 सुरक्षा रक्षकांची फौज असते… याबरोबरच एक एस्कॉर्ट गाडीही देण्यात येते

Z+ सुरक्षा- या श्रेणीत एनएसजी आणि सीआरपीएफचे 10 कमांडो, बुलेटप्रुफ गाड्यांसह 55 सुरक्षा रक्षक असतात… ही सुरक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिली जाते

दादांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असताना रोहित पवारांच्या जीवालाही धोका असल्याचं म्हटलं जातंय.. त्यामुळे सरकार रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना कशाप्रकारे सुरक्षा पुरवणार…. याकडे राज्याचं लक्ष लागलंय…

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring