
राजकारणात भाकरी फिरवली पाहिजे, असे शरद पवार कधीकधी सांगतात. राज्यसभेवर जाण्याची आपली इच्छा नाही, असेही त्यांचे वक्तव्य होते. मात्र, सूत्रांनी सांगितले की, ८५ वर्षीय शरद पवार दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची तयारी करत आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांना एकमताने निवडले जावे, अशी मोर्चेबांधणी होत आहे. अर्थात शेवटच्या क्षणी पवार नवा चेहरा निवडू शकतात, अशीही चर्चा आहे. त्याचे चित्र येत्या आठ दिवसांत स्पष्ट होईल. देशातील १० राज्यांतील ३७ जागांसह महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यात महाविकास आघाडीकडे फक्त ४६ मते आहेत. या निवडणुकीतील मतांचा कोटा लक्षात घेता मविआकडून फक्त एकालाच राज्यसभेवर जाता येईल. पवार मैदानात उतरले तर उद्धवसेना, काँग्रेसकडून कुणालाही संधी मिळणार नाही. महायुतीचे २२८ आमदारांचे २ एप्रिलला महाराष्ट्रातील या ७ खासदारांची जागा रिक्त होणार राजकीय परिणाम मविआची अभेद्य तटबंदी: पवारांच्या नावामुळे मविआची ४६ मते ‘फेव्हिकॉल’सारखी एकत्र राहतील. दिल्लीतील प्रभाव : ‘इंडिया’ आघाडीत पवारांचे अस्तित्व भाजपविरोधी गटाला मोठी शक्ती देईल. निवडणूक कार्यक्रम अधिसूचना: २६ फेब्रुवारी अर्ज भरण्याची मुदत: ५ मार्चपर्यंत मतदान: १६ मार्च (सकाळी ९ ते ४) निकाल: १६ मार्च (सायंकाळी ५ नंतर) अजित पवार गटावर नैतिक दबावासाठी चाल राजकीय विश्लेषकांच्या मते पवारांचे राज्यसभा रिंगणात उतरण्याचे संकेत म्हणजे अजित पवार गटावर नैतिक दबावासाठी चाल आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या हालचाली सुरू असतानाच, पवारांनी स्वतःचे ‘पॉवर सेंटर’ दिल्लीत सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गट एकत्र आले, तर पक्षाची कमान आणि संसदेतील नेतृत्वाची धुरा आपल्याच हाती राहावी असा त्यांचा प्रयत्न आहे.