Wednesday, March 18, 2026
HomeNewsMartahiराजापुरातील प्रभाग सहामध्ये स्वच्छता मोहीम

राजापुरातील प्रभाग सहामध्ये स्वच्छता मोहीम

-rat१७p२३.jpg-
२६O२५१७८
राजापूर ः स्वच्छतामोहिमेमध्ये सहभागी झालेले नगरसेवक अ‍ॅड. जमीर खलिफे, नगरसेविका अफरोज झारी आणि पालिका कर्मचारी, सफाई कामगार.
—-
राजापुरातील प्रभाग सहामध्ये स्वच्छतामोहीम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ : राजापूर शहर ‘स्वच्छ आणि सुंदर’ करण्यासाठी नगर पालिकेच्यावतीने शहरामध्ये स्वच्छतेचा जागर केला जात असून, त्या अंतर्गत शहरामध्ये विशेष स्वच्छतामोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये शहरातील प्रभाग ६ मधील मुल्लावाडा, चव्हाणवाडी, झरीरोड परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामध्ये माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. जमीर खलिफे, नगरसेविका अफरोज झारी यांच्यासह पालिका प्रशासन आणि नागरिक सहभागी झाले होते.
राजापूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या सूचनेनुसार आणि मुख्याधिकारी अभिजित कुंभार, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या र्मादर्शनाखाली शहरामध्ये ‘स्वच्छतेचा जागर’ केला जात आहे. त्या अनुषंगाने पालिकेमध्ये विशेष स्वच्छतामोहीम राबवली जात असून, प्रभाग ६ मधील मुल्लावाडा, चव्हाणवाडी, झरीरोड परिसरामध्ये आज स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेमध्ये नगरसेवक अ‍ॅड. जमीर खलिफे, नगरसेविका अफरोज झारी, ग्रामस्थ फिरोजा मुल्ला, मुनज्जा सय्यद, हुस्ना सय्यद, हुसैन मुंगीस पालिकेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता सुप्रिया पोतदार, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, सिटी को-ऑर्डिनेटर हर्षदा सावंत, संदेश जाधव यांसह सफाई कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments