Monday, March 23, 2026
HomeNewsMartahiरमेश फिरोदिया महाविद्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला:कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या आवारात भव्य मिरवणुकीने

रमेश फिरोदिया महाविद्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला:कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या आवारात भव्य मिरवणुकीने

रमेश फिरोदिया महाविद्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला:कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या आवारात भव्य मिरवणुकीने
प्रतिनिधी|अहिल्यानगर वाळुंज येथील रमेश फिरोदिया आर्किटेक्चर महाविद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. संपूर्ण महाविद्यालय परिसर भगव्या पताकांनी सजला होता. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी महाविद्यालयाच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या २० फुटी भव्य फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या आवारात भव्य मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणुकीत सहभाग घेतला. महाविद्यालयामध्ये फुलांची सजावट आणि सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा दिला. छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष विद्यार्थ्यांनी केला. यावेळा प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments