सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २० : म्हापण-मळई येथील माळरानावर लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. सुमारे ३५ एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. हा प्रकार गुरुवारी (ता. १९) दुपारी घडला.
सुक्या गवताला लागलेल्या आगीने बघता-बघता रौद्ररूप धारण केले. त्यामुळे सुमारे ३० ते ३५ एकर क्षेत्राला आगीचा वेढा बसला. माळरानावरील दुपारच्या सत्रातील कडक उन्हात सुक्या गवतामुळे आणि वाऱ्याच्या वेगामुळे ही आग म्हापण, मळई, बावळी परिसरापर्यंत वेगाने पसरली. या आगीत बागायतदार विजय ठाकूर यांच्यासह पाच ते सहा शेतकऱ्यांच्या काजू आणि आंबा बागायतीतील कलमे जळून खाक झाली. आजूबाजूच्या काही काजू व आंबा कलमांना आगीची झळ बसली आहे. हंगामाला सुरुवात होत असताना अचानक बागायतीत घडलेल्या या प्रकाराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले, अन्यथा मोठे नुकसान झाले असते. नेमकी आग लागल्याचे कारण समजले नसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();