Tuesday, March 17, 2026
HomeNewsMartahiमोबाईल चोरट्याच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या:वसमत पोलिसांकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, 12 मोबाईलही...

मोबाईल चोरट्याच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या:वसमत पोलिसांकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, 12 मोबाईलही हस्तगत

मोबाईल चोरट्याच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या:वसमत पोलिसांकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, 12 मोबाईलही हस्तगत
वसमत येथे एका खाजगी ट्रॅव्हल्स समोर ठेवण्यात आलेले ७.३७ लाख रुपये किंमतीचे १२ मोबाईल असलेले पार्सल पळविणाऱ्या चोरट्यास वसमत पोलिसांच्या पथकाने गुरुवारी ता. १९ पकडले असून त्याच्याकडून सर्व मोबाईल जप्त करण्यात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील एका मोबाईल विक्रेत्याने पुणे येथून पार्सलद्वारे १२ मोबाईल मागविले होते. सदर मोबाईल एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या पार्सलद्वारे वसमत येथे ता. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी आले होते. त्यावेळी ट्रॅव्हल्सचे कार्यालय सुरु नसल्यामुळे कार्यालयाच्या समोरच पार्सल ठेऊन ट्रॅव्हल्स पुढच्या प्रवासाला निघून गेली होती. यावेळी कार्यालय बंद असल्याचा गैरफायदा घेत एका चोरट्याने पार्सल पळविले. यामध्ये ७.३७ लाख रुपये किंमतीचे १२ मोबाईल होते. दरम्यान, संबंधित विक्रेत्याने पार्सलबाबत विचारणा केली असता त्यांना पार्सल आलेच नसल्याचे सांगण्यात आले. मात्र विक्रेत्याने संबंधित पुरवठादाराकडे विचारणा केली असता पार्सल पाठविण्यात आल्याचे सांगितले. त्यावरून ट्रॅव्हल्स कार्यालयावर काम करणाऱ्या दत्ता सोन्नर यांनी ता. १३ फेब्रवारी रोजीचे सकाळी सात वाजताचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात एका चोरट्याने पार्सल पळविल्याचे दिसून आले. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. १७ गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, जमादार संभाजी लकुळे, नागोराव बाभळे, रामदिनवार, गजानन भोपे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याची ओळख पटविली होती. पोलिसांचे पथक चोरट्याच्या मागावर होते. आज सकाळी पोलिसांच्या पथकाने शेख अरबाज (रा. वसमत) यास ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments