मुंबईकरांच्या कामाची बातमी! पश्चिम रेल्वेवर १५ डब्ब्यांची लोकल धावणार; ७,५०० प्रवाशांना बसता येणार

Mumbai native improve : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या ताफ्यात आता देशातील पहिली सलग १५ डब्यांची लोकल दाखल होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे. ही लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार आहे, त्यामुळे वसई विरारला जाणाऱ्या लोकलमधील गर्दी नियंत्रणात येऊ शकते, असा दावा केला जात आहे.

सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत, वाचा ठळक वैशिष्ट्ये काय?

पश्चिम रेल्वे मार्गावर देशातील 15 डब्यांची पहिली गाडी धावणार

चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीने ही तयार केली आहे

गर्दीच्या वेळी 15 डब्यांच्या गाडीत एकाचवेळी 7 हजार 555 प्रवासी प्रवास करू शकणार

आत्तापर्यंत 12 डब्याच्या गाडीला तीन डबे जोडून लोकल 15 डबा लोकल तयार केल्या जात होत्या

त्यामुळे लोकल रेकमध्ये वाढ करणे अशक्य होते

यावर तोडगा म्हणून *पहिली सलग 15 डबे असलेली आणि पूर्ण स्वदेशी बनावटीची आय सी एफ ने तयार केली आहे*

ही लोकल 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईवरून मुंबईकडे यायला रवाना झाली

यातील दुसरी लोकल फेब्रुवारी अखेरपर्यंत येणार असून आणखी 12 लोकल पाठवण्याची तयारी सुरू

अशी एक लोकल वाढल्यास 20 ते 22 लोकल फेऱ्या 15 डब्यांच्या होतील

सध्या फलाटाची लांबी वाढवण्याचे काम देखील सुरू

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart