Monday, March 23, 2026
HomeNewsMartahiमिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचे लेझीमपथक ठरले लक्षवेधी:पहाटेपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण

मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचे लेझीमपथक ठरले लक्षवेधी:पहाटेपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण

मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचे लेझीमपथक ठरले लक्षवेधी:पहाटेपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण
प्रतिनिधी|अहिल्यानगर शिवजयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था यांच्यावतीने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथक, पारंपारीक वाद्य असतात. पहाटेपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मिरवणुकीत संस्थेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गिरी, माजी मुख्याध्यापक सुरेश शेवाळे आदी उपस्थित होते. मिरवणुकीत लाल टाकी रोडवरील महाराष्ट्र बालक मंदिर शाळा सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत, हातात भगवे ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन देखावे सादर करत लेझीम डाव विविध चौकात खेळत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीची सुरुवात शहरातील प्रमुख चौकातून करण्यात आली. काही ठिकाणी शिवकालीन देखावे, तसेच सामाजिक संदेश देणारे फलक सादर करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी व बिस्किटाची व्यवस्था केली होती.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments